BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
खैरलांजी हत्याकांड : 20 वर्षांनी गावात आता परिस्थिती कशी आहे? - ग्राऊंड रिपोर्ट
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाला आज (29 सप्टेंबर) 20 वर्षे पूर्ण होत आहेत.
13 वर्षं, 763 डुबक्या आणि एकच आशा... त्सुनामीत हरवलेल्या पत्नीला पुन्हा भेटण्याची
2011 मध्ये जपानच्या ईशान्य किनारपट्टीवर त्सुनामी धडकली होती. या त्सुनामीनं वाटेत येईल ते सगळं काही उद्ध्वस्त करत पुढे वाटचाल केली होती.
हृदयाची तपासणी करायला अजून वेळ आहे असं वाटतंय? चाळीशीपूर्वी 'या' गोष्टी जाणून घ्या
हार्ट अटॅक हा केवळ वृद्धांचा आजार नाही. उच्च रक्तदाब, वाढलेलं कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि तणाव यांसारखे जोखीम घटक विशी-तिशीतच दिसू शकतात. मग 40 वर्षांपूर्वी हृदयाची तपासणी कुणी करावी आणि कोणती लक्षणं दुर्लक्षित करू नयेत?
गोल्डी ब्रारचा अमेरिकेच्या 'मोस्ट वॉन्टेड'च्या यादीत समावेश; गोल्डी ब्रार गँगस्टर कसा बनला?
अमेरिकेची केंद्रीय फेडरल तपास यंत्रणा एफबीआयनं सतिंदरजीत सिंह उर्फ गोल्डी ब्रार याचा आपल्या "टेन मोस्ट वॉन्टेड फ्युजिटिव्ह्स" म्हणजे देशातील 10 सर्वाधिक वॉन्टेड फरार गुन्हेगारांच्या यादीत समावेश केला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका, SIR वरुन राज्यात काँग्रेसकडून आंदोलन
या बैठकीत मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन (SIR) आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
व्हीडिओ, उज्जैन : रस्ता रुंदीकरणासाठी मशिदीचा भाग पाडण्यावरून वाढला तणाव, वेळ 1,41
सिंहस्थ 2028 च्या तयारीसाठी रस्त्याचं रुंदीकरण सुरू असताना, सोमवारी सकाळी शाही मशिदीवरून वाद सुरू झाला. ही मशीद 650 वर्षं जुनी असल्याचं सांगितलं जातंय.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आयआयटीत शिकत असताना काय अनुभव येतात?
या संस्थेमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना बीबीसी मराठीने विचारले की त्यांचा याबाबतचा अनुभव काय आहे. तसेच तेथील फॅकल्टीला देखील विचारले की त्यांना जातिभेदाबद्दलचा काय अनुभव आलाय. त्यांच्याशी बोलून बीबीसीने हा रिपोर्ट केला आहे.
व्हीडिओ, राज्यात सध्या हवामानाची काय स्थिती आहे? पुढचे काही दिवस कुठे पाऊस पडेल?, वेळ 5,02
राज्यात सध्या हवामानाची काय स्थिती आहे? पुढचे काही दिवस कुठे पाऊस पडेल? कुठे हवामान कोरडंच असेल? नेमकी काय स्थिती असेल? जाणून घेऊयात.
आईच्या प्रियकरांकडून वारंवार बलात्कार; आता त्याच महिलेला होणार फाशी
पाइकच्या आईच्या अनेक पती आणि प्रियकरांनी तिच्यावर शारीरिक आणि लैंगिक अत्याचार केले होते. तिच्यावर अनेक वेळा बलात्कारही झाला होता. एकदा ती 11 वर्षांची असताना आणि पुन्हा 17 वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाला.
Live, लाईव्ह टीव्ही पाहण्यासाठी इथे क्लिक करा
बीबीसी मराठीवर पाहा देश आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या आणि विश्लेषण
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, IIT मुंबईतील साहिल वाकोडेच्या मृत्यू प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं? - सविस्तर रिपोर्ट, वेळ 5,52
18 सप्टेंबर रोजी मुंबईतील आयआयटीमध्ये द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह खोलीत आढळल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात आले.
व्हीडिओ, 'NET, SET, PhD; तरीही कायम नोकरी नाही', महाराष्ट्रातल्या प्राध्यापकांची 'तासनदारी' - ग्राऊंड रिपोर्ट, वेळ 6,43
महाराष्ट्रात हजारो प्राध्यापक नेट-सेट, पीएचडी करूनही पूर्णवेळ नोकरीची वाट बघत आहेत. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवणारे हे प्राध्यापक आजही 'क्लॉक अवर बेसिस' (सीएचबी) किंवा घड्याळी तासिका तत्त्वावर काम करत आहेत.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : पाकिस्तानच्या कराचीमध्ये गणेशोत्सव कसा साजरा होतो? जाणून घ्या महाराष्ट्र कनेक्शन, वेळ 4,39
पाकिस्तानातील गणेशोत्सव हा एक दुर्मिळ अनुभव आहे. कराचीमध्ये मराठी संस्कृतीची ही झलक पाहणे रंजक आहे.
व्हीडिओ, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त दुष्काळाचं संकट 'या' 20 जिल्ह्यांवर , वेळ 4,02
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सरासरी इतका पाऊस झालेला नाही. त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान अनेक भागांत होत आहे. सगळ्यात जास्त दुष्काळाचा धोका कोणत्या 20 जिल्ह्यांना आहे?
व्हीडिओ, 'या' गावात मशिदीत बसतो गणपती; हिंदू आणि मुस्लीम एकत्र साजरा करतात गणेशोत्सव , वेळ 3,34
कोल्हापूर आणि सांगलीतील या गावांत मशिदीत हिंदू आणि मुस्लीम एकत्र गणेशोत्स्व साजरा करतात. कुठे दर्ग्याच्या दारावर गणपती विराजमान आहे, तर कुठे पीर आणि गणपती एकत्र दिसतात.
व्हीडिओ, ग्राऊंड रिपोर्ट : समृद्धी महामार्गाच्या शेजारील गावांमधले रस्ते मात्र खड्ड्यांचे, लोक का म्हणतात?, वेळ 4,10
समृद्धी महामार्गावरून वेगाने प्रवास करता येतो, पण त्याच महामार्गाला लागून असलेल्या गावांमध्ये जाण्यासाठी अजूनही खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागतो.
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : नोकरदार नसलेल्यांना होमलोन कसं मिळू शकतं?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : ‘रीवाईल्डिंग’ करून हवामान बदल रोखता येईल?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
अफगाणिस्तानातल्या पुरातन गार्देझ गणपतीची गोष्ट, कसा होता काबूलचा 'महाविनायक'?
काबूलच्या उत्तरेला दहा मैलांवर सकर धर (शंकर धर) इथे ही दुसरी मूर्ती सापडली होती आणि ती काबूलच्या राष्ट्रीय संग्रहालयात आणण्यात आली होती. ती चौथ्या शतकाच्या मध्यातली असावी असा अंदाज ढवळीकरांनी व्यक्त केला आहे.
पालावरचं आयुष्य: 'गुन्हेगार जमाती कायदा' रद्द होऊन 74 वर्षं झाली, पण 'या' जगण्यात किती बदल घडला?
विमुक्तीची 75 वर्षे साजरी करण्याचा सर्वात अर्थपूर्ण मार्ग कदाचित हाच असेल की, पुढील पिढीतील कोणत्याही विमुक्त मुलाला आपल्या आडनावापूर्वी आपल्या जातीचा आणि जातीपूर्वी आपल्या पूर्वजांवर लादलेल्या 'गुन्हेगार' या इतिहासाचा भार वाहावा लागू नये.
गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर
लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हान्ले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. आणि पर्यटकांना त्यासाठी मदत करतात अॅस्ट्रो अॅम्बॅसेडर.
घारापुरी एलिफंटाच्या नव्या उत्खननात सापडल्या 'या' गोष्टी, ज्यामुळे उलगडली इतिहासातली अनेक रहस्यं
घारापुरी-एलिफंटा येथील नव्या उत्खननातून अनेक नव्या गोष्टींची उकल झाली आहे. फक्त लेण्याच नाही तर हे एक महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय व्यापार केंद्र होतं असे पुरावे या उत्खननातून सापडले आहेत.
खासगीकरणाने वंचितांच्या संधी घटल्या का? उपवर्गीकरणाचा फायदा-तोटा कुणाला होणार?
उच्च शिक्षणाचा दर्जा, वंचित समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेणं दिवसेंदिवस अवघड होत जाणं, आरक्षण आणि सर्वात महत्त्वाचं जातीभेद असे अनेक मुद्दे आजही समोर येत असल्याचं पाहायला मिळतं.




































































