You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'मीच एक बॉम्ब असतो तर'; लेबनॉन इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये उद्ध्वस्त झाल्यानंतर आबिद काय म्हणाले?
इस्रायलने बुधवारी लेबनॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आणि अनेकजण जखमी झाले.
इराणमध्ये युद्धविराम झाला असला तरी, लेबनॉनमधील 'हिजबुल्लाह' या सशस्त्र गटाविरुद्धचे युद्ध सुरूच राहील, असे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.
इस्रायलने या संघर्षातील ही सर्वात मोठी हवाई मोहीम असल्याचे म्हटले आहे. अवघ्या 10 मिनिटांत त्यांनी हिजबुल्लाहची 100 हून अधिक कमांड सेंटर्स आणि लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे.
बेरूतची दक्षिण उपनगरे, दक्षिण लेबनॉन आणि पूर्वेकडील बेक्का व्हॅली या सर्व ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
या हल्ल्यांनतर लेबनॉनच्या बेरूत शहरात काय उरलंय? पाहा बीबीसी प्रतिनिधी ह्युगो बचेगा यांचा हा रिपोर्ट.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)