फोटो गॅलरी : रंगारंग मुंबईची ब्लॅक अॅण्ड व्हाईट काळातली छायाचित्र

A camel ride on Mumbai's Marine Drive in 1977
फोटो कॅप्शन, मरीन ड्राइव्ह - उंटावरून सैर, 1977
Published

'मुंबई नगरी बडी बांका, जशी रावणाची दुसरी लंका..' असं एका लावणीत पठ्ठे बापूरावांनी मायानगरी मुंबईचं वर्णन केलं आहे. या नगरीने प्रत्येकावर भुरळ घातली आहे. कुणी यातून वाचलं असेल, अशी व्यक्ती सापडणं विरळा.

ज्येष्ठ छायाचित्रकार, निर्मात्या, पटकथाकार सूनी तारापूरवाला यांनी 1977 पासून मुंबईची निरनिराळी रूपं टिपली आहेत.

'मिसिसिपी मसाला', 'द नेमसेक' आणि 'ऑस्कर' नामांकनप्राप्त 'सलाम बॉम्बे' सारख्या सिनेमांचं लिखाण त्यांनी केलं. तसंच राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त 'लिटल झिजू'चं दिग्दर्शनही त्यांचंच होतं.

Lilliput (left) and Stellan Skarsgard on the set of The Perfect Murder, Bombay 1987
फोटो कॅप्शन, लिलिपूट आणि स्टेलन स्कार्सगार्ड 1987मध्ये सिनेमाच्या सेटवर.

सूनी तारापूरवाला यांनी टिपलेल्या या फोटोंमधून मुंबईच्या दैनंदिन जीवनाचं दर्शन तर होतच, शिवाय देशातल्या एका वैविध्यपूर्ण शहराच्या सामाजिक स्थानाचं महत्त्वही .

मुंबईबद्दल असलेल्या आपुलकीतून त्यांनी हे फोटो काढलेले आहेत.

सूनी तारापूरवाला यांनी काढलेल्या या फोटोंचं प्रदर्शन "होम इन द सीटी" या शीर्षकाने शेमोल्ड प्रेस्कॉट रोड या गॅलरीत ऑक्टोबर 2017 मध्ये भरलं होतं.

Children play with a toy gun in Cusrow Baug in Mumbai in 1985
फोटो कॅप्शन, खोट्या बंदुकीचा खेळ, 1985
A synagogue in Mumbai
फोटो कॅप्शन, सिनेगॉग, 2012
Spectators at an air show on Marine Drive
फोटो कॅप्शन, मरीन ड्राईव्हला झालेल्या एअर शोसाठी जमलेले प्रेक्षक, 2005
A security guard sits on charpoy at the Juhu Airport in 1982
फोटो कॅप्शन, विमानाची राखण, जुहू विमानतळ, 1982
On location while the movie The Perfect Murder was being shot in Mumbai in 1987
फोटो कॅप्शन, 'द परफेक्ट मर्डर' या सिनेमाच्या सेटवर, 1987
Sarfu and Irrfan Khan blindfolded during a workshop on the film, Salaam Bombay!
फोटो कॅप्शन, 'सलाम बॉम्बे' या सिनेमासाठी झालेल्या कार्यशाळेत अभिनेता सर्फू आणि इरफान खान (उजवीकडील), 1987
Arists MF Hussain drawing at his home in Mumbai
फोटो कॅप्शन, प्रख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या घरी, 2005. 2011मध्ये त्यांचं निधन झालं.
A girl looks at the ocean while standing on a beach in Mumbai
फोटो कॅप्शन, मुंबईची खासियत...चौपाटी
Men laughing while celebrating Ganesh Chaturthi, a Hindu festival
फोटो कॅप्शन, गणेश विसर्जनाचा माहोल, 2016
Naseeruddin Shah (left) and Stellan Skarsgard smiling on the sets of a film
फोटो कॅप्शन, नासिरूद्दीन शहा आणि स्टेलन स्कार्सगार्ड सिनेमाच्या सेटवर, 1987
A poster of former Prime Minister Indira Gandhi during the Congress party's centenary celebrations in 1985
फोटो कॅप्शन, काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमस्थळी इंदिरा गांधी यांचे पोस्टर, 1985
The navy band performs ahead of the premiere of the movie Janbaaz at Metro Cinema in 1986
फोटो कॅप्शन, 'जांबाझ'च्या प्रिमियरच्या वेळी नौदलाच्या बॅण्डचं सादरीकरण, 1986
Actor Raj Kapoor at the premiere of Janbaaz while a fan gazes at him
फोटो कॅप्शन, 'जांबाझ'च्या प्रीमियरला राज कपूरची एंट्री, 1986

.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)