क्रिकेट वर्ल्डकप मधील विक्रमी कामगिरींबद्दल या गोष्टी जाणून घ्या

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, वर्ल्डकप 2019 मध्ये सहभागी झालेल्या संघांचे कर्णधार
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

क्रिकेट वर्ल्डकप 2019 अवघ्या काही तासांवर आला आहे. वर्ल्डकप म्हटलं की विक्रम ओघाने आलेच. वर्ल्डकपदरम्यान रचल्या गेलेल्या विक्रमांचा घेतलेला आढावा.

सर्वाधिक रन्स

वर्ल्कपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम भारताच्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. मास्टर ब्लास्टर सचिनने 1992, 1996, 1999, 2003, 2007 आणि 2011 अशा सहा वर्ल्डकपमध्ये खेळताना धावांचा विक्रम रचला. आजही हा विक्रम अबाधित आहे.

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.

सर्वाधिक विकेट्स

ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा या यादीत अव्वलस्थानी आहे. 'विकेट टू विकेट' गोलंदाजीसाठी मॅकग्रा प्रसिद्ध होता. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्या मॅकग्राने वर्षानुवर्षे यशस्वीपणे सांभाळल्या.

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्राच्या नावावर आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सहभागी संघांची आतापर्यंतची कामगिरी

ऑस्ट्रेलियाच्या संघाने आतापर्यंत पाचवेळा वर्ल्डकपवर नाव कोरलं आहे. याची प्रचिती त्यांच्या कामगिरीतून येते. ऑस्ट्रेलियाचं विजयी होण्याचं प्रमाण 75 टक्के म्हणजे डिस्क्टिंशनसारखं आहे.

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, ऑस्ट्रेलियाची वर्ल्डकपमधली कामगिरी अचंबित करणारी आहे.

सर्वाधिक धावसंख्या आणि नीचांकी धावसंख्या

ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या मर्यादित अनुभवाचा फायदा उठवत चारशेची वेस ओलांडली होती. वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम त्यांच्या नावावर आहे.

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, श्रीलंकेने कॅनडाचा 36 धावांत खुर्दा उडवला होता.

कॅनडाच्या नवखेपणाचा फायदा उठवत श्रीलंकेने त्यांचा 36 धावांत खुर्दा उडवला होता.

इनिंग्जमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, ग्लेन मॅकग्राने नामिबियाला सळो की पळो करून सोडलं.

सर्वाधिक शतकं

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम सचिन तेंडुकरच्या नावावर आहे.

भागीदारीचे विक्रम (विकेट्सच्या क्रमाने)

वर्ल्डकप
फोटो कॅप्शन, ख्रिस गेल आणि मार्लन सॅम्युअल्स

वेगवान शतक

वर्ल्डकपमध्ये वेगवान शतक आयर्लंडच्या केव्हिन ओब्रायनच्या नावावर आहे. केव्हिनने 2011 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडविरुद्ध 50 चेंडूत शतक पूर्ण केलं होतं.

सर्वाधिक षटकार

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम ख्रिस गेल आणि एबी डी'व्हिलियर्स यांच्या नावावर संयुक्तपणे आहे. या दोघांनी वर्ल्डकपमध्ये प्रत्येकी 37 षटकार लगावले आहेत. ख्रिस गेल यंदाच्या वर्ल्डकपमध्येही खेळणार असून, षटकारांच्या रकान्यात भर घालण्यासाठी तो उत्सुक आहे. वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार असल्याचं गेलने जाहीर केलं आहे. षटकारांच्या भरघोस पुंजीसह खेळाला अलविदा करण्याचा गेलचा प्रयत्न असेल.

सर्वाधिक सामने

वर्ल्डकपचे सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम रिकी पॉन्टिंगच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार असलेल्या पॉन्टिंगने वर्ल्डकपमध्ये 46 मॅचेस खेळल्या आहेत. सचिन तेंडुलकर 45 सामन्यांसह दुसऱ्या स्थानी आहे.

सर्वाधिक कॅचेस

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक कॅचेस रिकी पॉन्टिंगच्याच नावावर आहेत. त्याने 28 कॅच टिपले आहेत. श्रीलंकेचा कुमार संगकारा कीपिंगच्या बाबतीत अव्वल स्थानी आहे. संगकाराने 41 कॅच घेतले आहेत तर 13 बॅट्समनना स्टंपिंग केलं आहे.

यंग अँड ओल्ड

कॅनडाचा नितीश कुमार हा वर्ल्डकपमध्ये खेळणारा सगळ्यात लहान वयाचा खेळाडू आहे. सोळाव्या वर्षी नितीशने वर्ल्डकप पदार्पण केलं होतं. नेदरलँड्सचा नोलन क्लार्क हा वर्ल्डकपमध्ये खेळणारा सगळ्यात वयस्कर खेळाडू आहे. 47 वर्षांचा नोलन 1996 वर्ल्डकपमध्ये खेळला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)