नीट पाहा, तुम्हालाही हे स्थिर चित्र हलताना दिसेल, पण का?

फोटो
फोटो कॅप्शन, तुम्हाला या फोटोत काही हालचाल दिसतेय का?
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

तुम्हाला वरच्या चित्रात काय दिसतंय? ते स्थिर आहे की त्यात काही हालचाल होतेय? हा एखादा व्हीडिओ किंवा अनिमेटेड GIF तर नाही ना?

वास्तविक हे चित्र optical illusion किंवा दृष्टिभ्रमाचं एक उदाहरण आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी इंटरनेटवर हा फोटो शेअर शेअर केला आहे. पण यामागचं विज्ञान काय आहे?

हा फोटो सगळ्यांत आधी न्युरोसायंटिसिस्ट एलिस ब्रोवर्ब यांनी शेअर केला. ते experimental psychologist आहेत, म्हणजे मानवी मेंदू कसा काम करतो, याचा ते अभ्यास करतात.

हे चित्र मल्टिमीडिया आर्टिस्ट बॉ डिले यांनी तयार केलं आहे. त्यात एका बॉल एका स्तंभासकट फिरताना दिसतोय. मात्र हे कोणत्याही प्रकारचं अनिमेशन किंवा GIF नाही, हे आधीच स्पष्ट केलेलं बरं.

एलिस यांच्या मते हे चित्र 100 टक्के स्थिर आहे. मात्र त्याला अशा पद्धतीने तयार केलं गेलंय की ते मेंदूला चकवा देतं आणि आपल्याला वाटतं की त्यातल्या वस्तू फिरत आहेत.

मेंदूला असा भ्रम का होतो

आता हा फोटो का हलतोय, हे समजण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींचा परिचय करून घ्यावा लागेल - V4 आणि V5.

या चित्राविषयी सोशल मीडियावर लिहिताना एलिस सांगतात की V5 मुळे आपल्या हालचालीचं ज्ञान मिळतं तर V4 रंगाना आणि आकृत्यांना समजण्यासाठी कामी येतात.

"V4ची क्षमता पूर्ण झाल्यावर V5 आपलं काम सुरू करतं," असं एलिस सांगतात.

माणसाचा मेंदू

"आपल्याला दिसत असलेल्या गोष्टींबाबत आपल्या मेंदूत एक प्रकारचं द्वंद्व निर्माण होतं. त्यामुळे हा दृष्टिभ्रम होतो. जेव्हा एक प्रकारचे सिग्नल दबून जातात, तेव्हा दुसऱ्या प्रकारचे सिग्नल जास्त प्रमाणात ग्रहण केले जातात," असं ते पुढे सांगतात.

फोटो

एलिस यांच्या याविषयीच्या ट्वीटवर बॉ डीले यांनी अशाच प्रकारचे आणखी काही फोटो शेअर केले आहेत. जर तुम्हाला या फोटोंमध्ये हालचाली दिसत नसतील तर कदाचित तुम्ही ते मोठ्या स्क्रीनवर बघत नसाल.

फोटो

तुम्ही कदाचित मोबाईल स्क्रीनवर बघत असाल. चांगला इफेक्ट बघायचा असेल तर तिरक्या नजरेने पाहा किंवा कॉम्प्युटरच्या मोठ्या स्क्रीनवर पाहा.

फोटो

एलिस ब्रोवर्ब यांच्या मते तुम्ही हे फोटो किती अंतरावरून पाहत आहात, यावरही हा इफेक्ट कसा दिसतो, हे अवलंबून आहे.

हेही वाचलंत का?

हे एक घर आहे दोन देशात!

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)