You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राजीव चंद्रशेखर : 'भाजप फक्त हिंदुत्वापुरती मर्यादित नाही', केरळमध्ये काय करणार?
केरळमधील भाजपचे महत्त्वाचे नेते आणि भाजप प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी बीबीसी मराठीला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केरळमधील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले.
'भाजपला 30 वर्षांपासून कोपऱ्यात दाबून ठेवण्यासाठी काँग्रेस आणि CPM ने जाणीवपूर्वक जातीयवादी पक्ष असल्याचा नॅरेटिव्ह चालवला,' असा आरोप त्यांनी केला.
केरळमध्ये पंतप्रधान मोदींची विश्वासार्हता 62 टक्के असून भाजपचा जनाधार वाढत असल्याचे त्यांनी सांगितलं. 'द केरळ स्टोरी' सारख्या चित्रपटांवर बोलताना त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन केले. तसंच ख्रिश्चन आणि मुस्लीम समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी भाजपने विशेष प्रयत्न केल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या 'बी टीम' असण्याच्या आरोपांचा समाचार घेतला.
मुलाखत - मयुरेश कोण्णूर
एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)