महाराष्ट्रातील सरकारी शाळांची दुरवस्था: कुठे मंदिरात वर्ग, कुठे वर्गात पाऊस

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे
जालना जिल्ह्यातल्या परदेशीवाडी गावात 5 वर्षं उलटली तरी जिल्हा परिषदेच्या शाळेतील एका वर्गखोलीचं बांधकाम पूर्ण झालेलं नाही.
परिणामी गावातील मंदिरात शाळा भरवावी लागते. छत्रपती संभाजीनगरच्या पळशी गावातील शाळेत पत्र्यांमधून गळणारं पाणी थेट वर्गात शिरतं.
तर डोनवाडा गावात बाहेर पाऊस पडला की वर्गात विद्यार्थ्यांना पाणी उपसावं लागतं. राज्यभरातल्या सरकारी शाळांची दुरवस्था सांगणारा बीबीसी मराठीचा हा विशेष रिपोर्ट.
रिपोर्ट – श्रीकांत बंगाळे
शूट – किरण साकळे
व्हीडिओ एडिट – अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






















