अभिनेता अजय देवगण यांच्या जुहूच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई

व्हीडिओ कॅप्शन, अजय देवगण यांच्या जुहूतील बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई
अभिनेता अजय देवगण यांच्या जुहूच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामावर कारवाई
Published

कपोले को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील बंगल्यात सुरू असलेल्या कथित अनधिकृत अंतर्गत बांधकामाचा काही भाग मुंबई महापालिकेने हटवला आहे. महापालिकेने 10 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भात नोटीस बजावली होती.

या कामासाठी महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाची आवश्यक मंजुरी घेण्यात आली नसल्याने संबंधित बांधकामाचा काही भाग हटवण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणामुळे अभिनेता अजय देवगण यांच्या बंगल्यातील बांधकामाचा मुद्दा चर्चेत आला आहे. या प्रकरणातील सर्व बाबी आणि संबंधित पक्षांची भूमिका अधिकृतरीत्या समोर येणं बाकी आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)