फोटो - कुत्र्याचं पिलू वाघाच्या बछड्यांबरोबर खेळतं तेव्हा...

गोल्डन रिट्रीव्हर आणि पांढऱ्या वाघाचं बछडं
फोटो कॅप्शन, गोल्डन रिट्रीव्हर आणि पांढऱ्या वाघाचं बछडं
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

बीजिंगधल्या एका पार्कमध्ये पाळीव कुत्र्याची छोटी पिलं जंगली प्राण्यांबरोबर खेळत असतानाची छायाचित्रं सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाघ आणि सिंह यांच्यासोबत कुत्र्याचं पिलू खेळताना या फोटोंमध्ये दिसून येतं. मोगलीची कथा आठवावी अशी ही छायाचित्रं गुरुवारी टिपण्यात आली.

"या कुत्र्याच्या आईनं या सर्व जंगली प्राण्यांच्या पिलांना आपलं दूध पाजलं होतं. यामध्ये सायबेरियन टायगर, व्हाईट टायगर, आफ्रिकन लायन या प्राण्यांच्या पिलांचा समावेश आहे, ज्यांना त्यांच्या मातांनी सोडून दिलं होतं," असं माध्यमांचं म्हणणं आहे.

त्यामुळे ही सर्व पिलं एकत्र वाढली आणि आता एकमेकांच्या खूप जवळ आली आहेत.

"अस्वल, कांगारू आणि माकड यांच्यासारखी सोडून देण्यात आलेली पिलं आम्ही यशस्वीरीत्या वाढवली आहे," असं Beijing Wildlife Parkने म्हटलं आहे.

हे फोटो ट्विटरवरही हजारो लोकांनी शेयर केले.

कुत्र्याचं पिलू आणि वाघाचा बछडा एकमेकांसोबत खेळताना
फोटो कॅप्शन, कुत्र्याचं पिलू आणि वाघाचा बछडा एकमेकांसोबत खेळताना
वाघ आणि सिंहाची बछडी एकमेकांबरोबर खेळताना
फोटो कॅप्शन, वाघ आणि सिंहाची बछडी एकमेकांबरोबर खेळताना
या बच्चे कंपनीना बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे
फोटो कॅप्शन, या बच्चे कंपनीना बघण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे
वाघाचा बछडा दोन कुत्र्यांच्या पिलांना गोंजरताना.
फोटो कॅप्शन, वाघाचा बछडा दोन कुत्र्यांच्या पिलांना गोंजरताना.

.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)