कॉमनवेल्थ 2022: हरमनप्रीत सिंगच्या गोलमुळे भारत हॉकीच्या उपांत्य फेरीत

हरमनप्रित सिंग
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

हरमनप्रीत सिंहने केलेल्या हॅटट्रिकमुळे भारताने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ मध्ये सेमीफायनल मध्ये जागा मिळवली आहे.

हरमनप्रीत सिंह ची या स्पर्धेतली दुसरी हॅटट्रिक आहे. त्यामुळे भारत आता 10 गुण घेऊन ग्रुप बी मध्ये टॉपवर आहे.

त्यामुळे पहिल्या स्थानावर असलेल्या भारताला आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळावं लागणार नाही. आता त्यांचा ग्रुप ए च्या दुसऱ्या क्रमाकांच्या संघाशी सामना होईल. न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, आणि पाकिस्तानशी त्यांचा सामना होऊ शकतो.

भारताने या स्पर्धेत आतापर्यंत 27 गोल केले आहेत. ग्रुप बी मध्ये उच्चस्थानी येण्यासाठी इंग्लंडला कॅनडाविरुद्ध 15 गोल करावे लागणार होते. मात्र तसं झालं नाही.

कॅनडावर 8-0 ने मात

तत्पूर्वी कॉमनवेल्थ स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने कॅनडावर 8-0 ने मात केली

भारताने या आधी कॅनडावर 2018 च्या वर्ल्ड कपमध्ये आणि 1988 च्या ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवला होता. तेव्हा भारताने कॅनडाला 5-1 ने पराभूत केलं होतं.

2019 मध्ये सुलतान कपमध्येही भारताने कॅनडावर मोठा विजय मिळवला होता. मात्र तेव्हा सातपैकी तीन गोल ग्राह्य धरले नव्हते. त्यामुळे हा विजय आजवरचा सर्वात मोठा विजय आहे.

आकाशदीपने सामन्यात आणली रंगत

भारतीय खेळाडू आकाशदीप सिंह गेल्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये दुखापतीमुळे भाग घेऊ शकला नाही. एकदा संघाच्या बाहेर गेलं की खेळाडूंच्या मनोबलावर परिणाम होतो. मात्र आकाशदीपने या सामन्यात दोन गोल करत रंगत निर्माण केली.

हॉकी

इतकंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीने मनदीप आणि ललित उपाध्याय यांच्यासाठी गोल करण्याच्या दृष्टीने व्यूहरचनाही तयार केली. त्यामुळे आकाशदीप आता उत्तम खेळतोय हे पाहून चांगलं वाटलं. आकाशदीपने पाचवा आणि आठवा गोल केला. हे दोन्ही गोल अतिशय उत्तम पद्धतीने करण्यात आले.

भारतीय फॉर्वर्ड लाईन वर खेळणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध केलेल्या कामगिरीचा दबाव होता. पण ज्या पद्धतीने भारत खेळला आहे ते पाहता इंग्लंड विरुद्धच्या अपयशातून बाहेर आला आहे असं म्हणायला हरकत नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)