कोरोना व्हायरस : दिवाळीची खरेदी करण्यासाठी गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा फज्जा

प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

राज्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन दिवाळीची खरेदी करताना गर्दी न करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं.

पण, सध्या दिवाळीची खरेदी करण्यासाठी राज्यातल्या अनेक भागांमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर एकत्र येताना दिसून येत आहेत.

मुंबई, नागपूर, औरंगाबाद, अमरावती अशा वेगवेगळ्या शहरांमधील बाजारपेठा दिवाळीनिमित्त गजबजलेल्या दिसून येत आहे.

ग्राहकांचाही त्यांना चांगला प्रतिसाद लाभल्याचं जमलेल्या गर्दीमुळे समोर येत आहे.

व्हीडिओ कॅप्शन, दिवाळीच्या गर्दीने कोरोनाच्या भीतीला चिरडून टाकलं?

पण, यंदाची दिवाळी ही इतर वेळच्या दिवाळीपेक्षा वेगळी आहे, कारण यंदा कोरोनाचं संकट आपल्यासमोर आहे, म्हणून ही दिवाळी गर्दी न करता घरात राहून साजरी करावी, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी जनतेला केलं होतं.

रविवारी (8 नोव्हेंबर) जनतेला संबोधित करताना त्यांनी असं आवाहन केलं होतं. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवसापासूनच राज्यभरातल्या अनेक बाजारपेठांमध्ये गर्दी दिसून आली.

राज्यात कुठे कुठे गर्दीची दृश्यं समोर आली, तेच आपण फोटोंच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मुंबईतल्या दादर येथे आज संध्याकाळी दिवाळीची खरेदी करण्यासाठी जमलेली गर्दी
फोटो कॅप्शन, मुंबईतल्या दादर येथे संध्याकाळी दिवाळीची खरेदी करण्यासाठी जमलेली गर्दी.
पुण्यात आज दुपारी नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली.
फोटो कॅप्शन, पुण्यात दुपारी नागरिकांनी खरेदीसाठी मार्केटमध्ये गर्दी केली.
अमरावतीमध्ये दिवाळीची खरेदी करताना गर्दी दिसून आली.
फोटो कॅप्शन, अमरावतीमध्ये दिवाळीची खरेदी करताना गर्दी दिसून आली.
नाशिकमधील मुख्य बाजारपेठेतील दहीपुला कडे जाणारा रस्ता. गर्दीमुळे चार चाकी वाहनांना बंदी करावी लागली.
फोटो कॅप्शन, नाशिकमधील मुख्य बाजारपेठेतील दहीपुला कडे जाणारा रस्ता. गर्दीमुळे चार चाकी वाहनांना बंदी करावी लागली.
नागपूरच्या सीताबर्डी भागात रविवारी दिवाळीची खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले.
फोटो कॅप्शन, नागपूरच्या सीताबर्डी भागात रविवारी दिवाळीची खरेदी करताना मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र आले.
5 नोव्हेंबरला मुंबईतल्या बाजारात आकाश कंदिल खरेदी करताना नागरिक.
फोटो कॅप्शन, 5 नोव्हेंबरला मुंबईतल्या बाजारात आकाश कंदिल खरेदी करताना नागरिक
कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड परिसर.
फोटो कॅप्शन, कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड परिसर.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)