जोरदार थंडी, तिखटजाळाची मिसळ आणि नवा विक्रम

मिसळ
फोटो कॅप्शन, कोल्हापुरी मिसळ
    • Author, स्वाती पाटील-राजगोळकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी, कोल्हापूरहून
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

खाद्यसंस्कृती जगतात कोल्हापूर जिल्ह्याची एक वेगळी ओळख आहे. ही ओळख आज पुन्हा एकदा अधोरेखित झाली. निमित्त होतं मिसळ खाण्याच्या उपक्रमाचं.

मिसळ
फोटो कॅप्शन, जोरदार थंडी आणि तिखटजाळाची मिसळ हे समीकरण कोल्हापूरकरांना आवडलं.

'Continental of Hotel Management' च्या वतीनं शेफ दिग्विजय भोसले यांनी बनवलेल्या कोल्हापूरी मिसळवर अनेकांनी ताव मारला.

मिसळ
फोटो कॅप्शन, मिसळीचा रटरटणारा रस्सा

सकाळच्या गुलाबी थंडीत, कोवळ्या उन्हात आबालवृद्ध मिसळ खाण्यासाठी रंकाळा तलावाकाठी असलेल्या पदपथ उद्यानात आवर्जून आले होते.

या चविष्ट उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ World Record मध्ये करण्यात आली आहे.

मिसळ
फोटो कॅप्शन, सर्व वयोगटातल्या व्यक्तींनी मिसळीवर ताव मारला

कोल्हापूर म्हटलं की खवय्यांच्या डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी गूळ, कोल्हापुरी मटण. त्यातही मिसळ म्हटलं तर तोंडाला पाणी सुटलं नाही तरच नवल.

मिसळ
फोटो कॅप्शन, तरुण मंडळी मिसळीचा आस्वाद घेताना

खवय्यांची ही आवडीची कोल्हापुरी मिसळ world record मध्ये गेलीय. कारण म्हणजे 2500 हून अधिक लोकांनी मिसळ खाण्याचा हा उपक्रम...

पर्यावरण पूरक ताटामध्ये मिसळचा चिवडा, कांदा, कोथिंबीर, लिंबू, लालभडक कट, आणि ब्रेड slice असा भन्नाट बेत रविवारी पूर्ण झाला. मिसळ खाण्याच्या या उपक्रमात कोल्हापूरकर हौसेने सहभागी झाले आणि त्यांनी झणझणीत मिसळीवर ताव मारला.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)