डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील कसा झाला पराभूत? : पाहा क्षणचित्रं

चंद्रहार पाटील
फोटो कॅप्शन, 61व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी सनसनाटी निकाल पाहायला मिळाला. माजी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलची (निळा पोषाख) लढत हिंगोलीच्या गणेश जगतापशी (नारिंगी पोषाख) होती.
Published

61व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी सनसनाटी निकाल पाहायला मिळाला.

चंद्रहार पाटील
फोटो कॅप्शन, महाराष्ट्र केसरी स्पर्धेत दोन वेळा जिंकलेल्या चंद्रहार पाटीलला (निळ्या पोषाखात ) पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.

डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटीलला यंदा पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. हिंगोलीच्या गणेश जगतापनं चंद्रहारला अवघ्या दीड मिनिटांत चीतपट केलं.

चंद्रहार पाटील
फोटो कॅप्शन, हिंगोलीच्या गणेश जगतापनं चंद्रहारला अवघ्या दीड मिनिटांत चीतपट केलं.

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावच्या स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत या स्पर्धेचा आखाडा सजला आहे. 'महाराष्ट्र केसरी' किताबाची लढत ही 86 ते 125 किलो या वजनी गटात खेळवली जाते.

चंद्रहार पाटील
फोटो कॅप्शन, या महत्त्वाच्या लढतीसाठी पुण्याच्या मुळशी तालुक्यातील भुगावच्या स्व. मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत आखाडा सजला होता.

या गटातील माती आणि मॅटवरील विजेत्यांमध्ये महाराष्ट्र केसरी किताबासाठी लढाई रंगते. येत्या २४ तारखेला संध्याकाळी महाराष्ट्र केसरी किताबासाठी अंतिम लढाई खेळवली जाईल.

महाराष्ट्र केसरी
फोटो कॅप्शन, राज्यातील ४५ जिल्हा व शहर तालीम संघातील ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. माती आणि मॅट (गादी) अशी दोन विभागांत ही कुस्ती स्पर्धा खेळवली जाते.

चंद्रहार पाटीलच्या कामगिरीविषयी महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींमध्ये उत्सुकता होती, पण त्याला पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.

चंद्रहार पाटील
फोटो कॅप्शन, अभिजीत काटके (निळा) आणि शिवराज राक्षे (लाल) यांच्यामधील लढतीतला हा महत्त्वाचा क्षण. दुखापतीमुळे ही लढत शिवराजने अर्धवट सोडली.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)