इराण-अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?

व्हीडिओ कॅप्शन, इराण अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?
इराण-अमेरिका शस्त्रसंधी पाकिस्तानने कशी घडवून आणली?

इराण आणि अमेरिकेत शस्त्रसंधी झाल्याची घोषणा करताना दोन्हीकडच्या नेत्यांनी पाकिस्तानचं नाव घेतलं.

इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ आणि फील्ड मार्शल आसीम मुनीर यांना आपले भाऊ म्हणत हे युद्ध थांबवण्यासाठीच्या त्यांच्या अथक प्रयत्नांचं कौतुक केलं.

ट्रम्प यांनी या शस्त्रसंधीबद्दल जी पोस्ट लिहिली त्याची सुरुवातच शरीफ आणि मुनीर यांच्या विनंतीवरून आपण हल्ले थांबवत असल्याचं त्यांनी म्हटलं. मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचं नाव चर्चेत आलं तेव्हा भारत का मध्यस्थ नाही असा प्रश्न विचारला जात होता.

  • संशोधन - टीम बीबीसी
  • निवेदन - सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)