'संपूर्णम' संस्था भंगलेल्या मूर्ती रिसायकल कशा करते? त्याचा नव्याने कसा वापर होतो?

'संपूर्णम' संस्था भंगलेल्या मूर्ती रिसायकल कशा करते? त्याचा नव्याने कसा वापर होतो?

नाशिकची संपूर्णम सेवा फाऊंडेशन ही संस्था देवांच्या भंगलेल्या मूर्ती, फोटो रिसायकल करण्याचं काम करते. 2019 साली सुरू झालेल्या या संस्थेने आतापर्यंत जवळपास 10 लाख फोटो, मूर्ती रिसायकल केल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.

या सर्व फोटो, मूर्तींपासून विविध गृहउपयोगी तसेच सजावटीच्या वस्तू बनवल्या जातात. विशेष म्हणजे ते बनवणारे कलाकार हे घरगुती काम करणाऱ्या स्त्रिया किंवा विद्यार्थी आहेत.

संपूर्णमच्या माध्यमातून तृप्ती या महिलांसाठी रोजगार निर्मितीही करत आहेत.

रिपोर्ट, शूटिंग आणि एडिटिंग - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)