विठाबाई नारायणगावकरांच्या तमाशा मंडळावर अहिल्यानगरमध्ये हल्ला का झाला?

विठाबाई नारायणगावकरांच्या तमाशा मंडळावर अहिल्यानगरमध्ये हल्ला का झाला?

राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर तमाशा मंडळातील पुरुष आणि महिला कलाकारांना मारहाण झाल्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतायत. संगमनेर तालुक्यातील वरुडी पठार भागात ही घटना 2 एप्रिलला घडली.

तमाशा मंडळाची बस आणि गावातल्या काही तरुणांची दुचाकी यांच्यात झालेल्या किरकोळ अपघातानंतर वाद पेटला, ज्याचं रूपांतर आधी भांडणात आणि मग हाणामारीत झालं.

व्हीडिओ - शाहीद शेख आणि गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे कलेक्शन)