मुंबई मॅरेथॉन : काही रंगतदार आणि अर्थपूर्ण क्षणचित्रं

या मॅरेथॉनमध्ये अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. छायाचित्रात मंदिरा बेदी दिसत आहे.
फोटो कॅप्शन, या मॅरेथॉनमध्ये अनेक सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. अभिनेत्री, अँकर मंदिरा बेदीदेखील मॅरेथॉनमध्ये धावली.
    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी
  • Published

मुंबई आंतररष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये यंदा इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. भारतीय महिलांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धावपटूंनी खणखणीत यश मिळवलं.

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे आपल्या शारीरिक क्षमतेची चाचणी असतेच, शिवाय या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून एखादा चांगला संदेश देणारे उत्साही धावपटूही दिसतात. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये प्लॅस्टिकचा धोका, लोकसंख्यावाढीचा धोका, मातृभाषा हरपण्याचा धोका सांगायचा प्रयत्न झाला तर बेटी बचाओसारखे संदेशही देण्यात आले. पुरुष हक्क, पुरुषांचं आरोग्य याविषयी सांगणारं एक चित्रही लक्ष वेधून घेत होतं.

मॅरेथॉन
फोटो कॅप्शन, पुरुष हक्क, पुरुषांचं आरोग्य याविषयी सांगणारं एक चित्र मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधून घेत होतं.

मुंबईमध्ये झालेल्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन'मध्ये जगभरातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनची काही कलरफुल क्षणचित्रं.

मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आफ्रिकन धावपटूंनी वर्चस्व राखलं. भारतीय महिलांच्या स्पर्धेत मात्र मराठी मुलींनी यश मिळवलं.

ऐतिहासीक पात्रांच्या वेशभूषेत सहभागी झालेले धावपटू.
फोटो कॅप्शन, ऐतिहासीक पात्रांच्या वेशभूषेत सहभागी झालेले धावपटू.
पहाटे 5.45 वाजता मॅरेथॉनला सुरूवात झाली.
फोटो कॅप्शन, पहाटे 5.45 वाजता मॅरेथॉनला सुरुवात झाली.
विजेत्या धावपटू संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे.
फोटो कॅप्शन, संजीवनी जाधव आणि मोनिका आथरे यांनी हाफ मॅरेथॉन स्पर्धेत यश मिळवलं. संजीवनी प्रथम तर मोनिका द्वितीय क्रमांकावर होती.
मोनिका आथरे
फोटो कॅप्शन, मोनिका आथरे
लोकसंख्या वाढ रोखण्याचा संदेश देणारा धावपटू
फोटो कॅप्शन, लोकसंख्या वाढ रोखण्याचा संदेश देणारा धावपटू
मोनिका आथरे
फोटो कॅप्शन, हाफ मॅरेथॉनमध्ये प्रथम आलेली संजीवनी जाधव
मातृभाषा जपा असा संदेश देणारी धावपटू.
फोटो कॅप्शन, मातृभाषा जपा असा संदेश देणारी धावपटू.
'बेटी बचाओ'चा संदेश देणारं कुटुंब.
फोटो कॅप्शन, 'बेटी बचाओ'चा संदेश देण्यासाठी एका कुटुंबानं मॅरेथॉनमध्ये अशी वेषभूषा केली होती.
मॅरेथॉन
फोटो कॅप्शन, प्लॅस्टिकचा भस्मासूर किती भयानक ठरू शकतो हा संदेश देणारा हा धावपटू अशी बोलकी वेषभूषा करूनच रस्त्यावर उतरला होता.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)