वर्षभरात 85 हजार महिलांची त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून हत्या का झाली?
वर्षभरात 85 हजार महिलांची त्यांच्या जवळच्याच व्यक्तींकडून हत्या का झाली?
Published
महिला आणि मुलींच्या लिंगामुळे होणाऱ्या हत्यांचं प्रमाण जागतिक स्तरावर वाढत आहे, तरीही त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार, लिंग-आधारित हत्यांमध्ये आता जवळच्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्यांकडून होणाऱ्या हत्यांचा सर्वाधिक वाटा आहे. सर्व महिला हत्यांपैकी 60 टक्के हत्या जोडीदाराकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडून होतात. युरोप वगळता जागतिक स्तरावर सर्व भागांमध्ये स्त्रीहत्येच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, ज्यामध्ये आफ्रिकेला सर्वाधिक फटका बसला आहे. तेथे 8 टक्के वाढ झाली आहे. पण हो, या संकटाचं खरं प्रमाण आणखी वाईट असू शकतं कारण अनेक देशांमध्ये अजूनही स्त्रीहत्येबाबत सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.






