नागपुरात तक्रार घेण्यासाठी पोलीस करतायेत चॅटबॉटचा वापर; पण डेटा सुरक्षेचं काय?
नागपुरात तक्रार घेण्यासाठी पोलीस करतायेत चॅटबॉटचा वापर; पण डेटा सुरक्षेचं काय?
नागपूरमधल्या नंदनवन पोलिस स्टेशनमधे पोलिस कर्मचारी चॅटब़ॉटचा वापर करून तक्रार नोंदवून घेत आहेत. चॅट जीपीटीला व्हॉईस टायपिंगद्वारे तक्रार दिली. हीच माहिती नंतर व्हॉट्सअपवर कॉपी करून पेस्ट करतात. त्यानंतर ही माहिती जशीच्या तशी पोलिस ठाण्याच्या सॉफ्टवेअरमध्ये पेस्ट करून तक्रार कॉपी जनरेट केली जाते.
जे ओपन एआय उपलब्ध आहे त्याचाच वापर करून या तक्रारी नोंदवल्या जात आहेत. या तक्रारी अदखलपात्र किंवा मोबाईल चोरी, अपघातासारख्या घटनांच्या असतात.
पण त्यामुळे अशा ओपन एआयचा वापर करून तक्रार नोंदवताना नागरिकांच्या पर्सनल डेटाचं काय? कुठल्या गोष्टी चॅट जीपीटीवर टाकायच्या कुठल्या नाही याबद्दल तक्रार नोंदवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कसं नियंत्रण ठेवणार? हे प्रश्नही उपस्थित होत आहेत. पाहा सविस्तर रिपोर्ट.
- रिपोर्ट- भाग्यश्री राऊत
- शूट- मनोज आगलावे
- एडिट- अरविंद पारेकर



