वैदिक काळातील मांसाहार ते महिलांचे अधिकार; बालभारतीच्या पुस्तकातील बदलांवर अभ्यासक काय म्हणत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, Rant - सहावीच्या बालभारतीच्या पुस्तकातील नव्या बदलांवर आक्षेप का घेतला जातोय?
वैदिक काळातील मांसाहार ते महिलांचे अधिकार; बालभारतीच्या पुस्तकातील बदलांवर अभ्यासक काय म्हणत आहेत?
Published

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाच्या (बालभारती) इयत्ता सहावीच्या इतिहास व नागरिकशास्त्र विषयाच्या पुस्तकातून वैदिक संस्कृतीशी संबंधित काही महत्त्वाचे संदर्भ वगळण्यात आले आहेत.

यामध्ये वैदिक काळातील मांसाहाराचा उल्लेख आणि वर्णव्यवस्थेतून निर्माण झालेली सामाजिक विषमता हे मुद्दे काढण्यात आले आहेत.

या बदलांवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख प्रा. श्रद्धा कुंभोजकर यांनी भूमिका मांडली आहे.

वैदिक साहित्यात शाकाहार आणि मांसाहार या दोन्ही मिश्र आहाराचे पुरावे मिळतात, त्यामुळे केवळ शाकाहारी चित्रण करणे वास्तवाशी विसंगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बालभारती प्रशासनाने या बदलांवर आपली बाजू मांडली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन