नरहरी झिरवाळांच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर छापा, पाहा व्हीडिओ
नरहरी झिरवाळांच्या मंत्रालयातल्या कार्यालयावर छापा, पाहा व्हीडिओ
Published
आपल्याला लाच मागितली जातीय पण माझी लाच देयची इच्छा नाही अशी तक्रार घेऊन 9 फेब्रुवारी रोजी एक मेडिकल स्टोअर चालवणारा इसम वरळी इथल्या लाच प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दाखल करतो.
पडताळणीत लाच मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी ACB कडून मंत्रालयात सापळा रचला जातो आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकून लिपिक राजू ढेरिंगे याला अटक केली आहे. मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील हे कार्यालय सील करण्यात आलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






