You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आयपीएल 2026 : तडाखेबाज फलंदाजीमुळं SRH नं मिळवला 65 धावांनी विजय, जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स
आयपीएलच्या सहाव्या सामन्यात फलंदाजांनी केलेल्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघानं कोलकाता नाईटरायडर्सचा तब्बल 65 धावांनी पराभव केला.
हैदराबाच्या ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि क्लासेनसह नितीश कुमार रेड्डी यांनी केलेल्या फटकेबाजीमुळं सनरायझर्स हैदराबादनं हा विजय मिळवला.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात 300 धावांचा टप्पा कोणता संघ ओलांडणार अशा चर्चा सुरुवातीपासूनच आहेत. एकापेक्षा एक तडाखेबाज फलंदाजांमुळं चाहतेही अशी आशा लावून आहेत.
गुरुवारी 2 एप्रिल पर्यंत स्पर्धेत सहा सामने झाले असून शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज यांच्यात सातवा सामना होत आहे.
आयपीएलच्या सर्व सामन्यांचे थोडक्यात निकाल आणि महत्त्वाचे अपडेट याठिकाणी तुम्ही वाचू शकता.
वैभवचा पहिल्याच सामन्यात तडाखा1
युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने 27 मार्चला 15 वा जन्मदिवस साजरा केला. यानंतर 3 दिवसांनी इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर वैभवनं केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
वैभवनं अशा खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जेथे काही क्षणांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते आणि सीएसकेचा संपूर्ण संघ 127 धावांवर सर्वबाद झाला होता.
मागील आयपीएल हंगामातही जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.
सोमवारी (30 मार्च) गुवाहाटीमध्ये त्याने स्वतःचाच आधीचा विक्रम मोडला. आणि आपल्या संघाच्या (राजस्थान रॉयल्स) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सने 47 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटनं सामना जिंकला.
आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात कोहलीची तुफान खेळी; RCB विजयी
शनिवारी संध्याकाळी, जेव्हा आयपीएलच्या चालू सिझनमध्ये बंगळूरुमध्ये हैदराबाद आणि आरसीबीचे संघ मैदानावर उतरले, तेव्हा हा सामना देखील स्पर्धेतील नेहमीच्या सामन्यांसारखाच होईल, असं वाटलं होतं.
पण जेव्हा हा सामना संपला, तेव्हा एक वेगळंच चित्र समोर आलं. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला क्रिकेटप्रेमींनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतलं.
विराट कोहली त्याच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्तम काळात होता, तेव्हा त्याचं ज्या प्रकारचं कौतुक व्हायचं तसंच कौतुक या सामन्यानंतर होताना दिसलं.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल 2026 च्या पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध सहज विजय मिळवला.
विराट कोहलीने आरसीबीकडून डावाची सुरुवात केली. कोहलीने अवघ्या 38 चेंडूंमध्ये नाबाद 69 धावांची खेळी केली.
त्याच्या या खेळीमुळे हैदराबादने दिलेले 200 हून अधिक धावांचं आव्हान अगदीच सहजसाध्य झालं.
आयपीएलच्या 2026 च्या हंगामातील सगळ्या सामन्यांचे निकाल खाली देत आहोत.
सामना क्रमांक 01 - RCB vs SRH
स्पर्धेच्या शुभारंभाचा हा सामना गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एम चिन्नस्वामी मैदानावर झाला.
प्रथम फलंदाजी करत एसआरएचनं आरसीबीसमोर 202 धावांचं आव्हान ठेवलं. ईशान किशननं 38 चेंडूत तडाखेबाज 80 धावा केल्या. आरसीबीसाठी डफी आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.
पण चेसमास्टर विराट कोहलीनं नेहमीप्रमाणं हे आव्हान अगदी सोपं करून दाखवलं. 69 धावांची नाबाद खेळी करत त्यानं 26 चेंडू शिल्लक ठेवत संघाला हा विजय मिळवून दिला.
पडिक्कलनं 26 चेंडूत 61 धावा करत विजय आणखी सोपा केला.
सामना क्रमांक 02 - KKR vs MI
आयपीएलच्या या हंगामातील दुसरा सामना केकेआर आणि मुंबई इंडियन्समध्ये झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने 6 विकेटनं विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत केकेआरनं मुंबईसमोर 221 धावांचं आव्हान ठेवलं. अजिंक्य रहाणेने 40 चेंडूत 67 धावा केल्या.
मुंबई इंडियने 6 विकेटने हा सामना जिंकला. रेयान रेकल्टनने 43 चेंडूत 81 धावा केल्या, तर रोहित शर्माने 38 चेंडूत 78 धावांची दमदार खेळी. तसेच मुंबईला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावली. मुंबईसाठी शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्या.
सामना क्रमांक 03 - CSK vs RR
युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने 27 मार्चला 15 वा जन्मदिवस साजरा केला. यानंतर 3 दिवसांनी इंडियन प्रीमियर लीगच्या आपल्या पहिल्या सामन्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरल्यावर वैभवनं केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं.
वैभवनं अशा खेळपट्टीवर चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जेथे काही क्षणांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्सचे (सीएसके) फलंदाज धावा करण्यासाठी झगडत होते आणि सीएसकेचा संपूर्ण संघ 127 धावांवर सर्वबाद झाला होता.
मागील आयपीएल हंगामातही जयपूरमध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध वैभवने 17 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले होते.
सोमवारी (30 मार्च) गुवाहाटीमध्ये त्याने स्वतःचाच आधीचा विक्रम मोडला. आणि आपल्या संघाच्या (राजस्थान रॉयल्स) विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्सने 47 चेंडू शिल्लक असताना 8 विकेटनं सामना जिंकला.
सामना क्रमांक 04 - GT vs KXIP
गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यात पंजाबच्या संघानं 3 विकेट राखून विजय मिळवला.
प्रथम फलंदाजी करत गुजरातच्या संघानं पंजाबसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्यात शुभमन गिलच्या 39, जोस बटलरच्या 38 आणि ग्लेन फिलिप्सच्या 25 धावांचा समावेश होता.
पंजाबच्या विजयकुमारनं 3 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात पंजाबच्या संघानं 3 विकेटनं सामना जिंकला. पण शेवटच्या ओव्हरपर्यंत त्यांना विजयासाठी प्रयत्न करावे लागले. कूपर कोनोलीच्या 44 चेंडूत 72 धावांच्या जोरावर पंजाबनं सहज विजय मिळवला.
कूपर कोनोरी 72 धावांच्या कामगिरीसाठी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.
सामना क्रमांक 05 - LSG vs DC
आयपीएलच्या पाचव्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघानं लखनऊ सुपर जायंट्सला 6 विकेट आणि 17 चेंडू राखून पराभूत केलं.
प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ 10 चेंडू शिल्लक असतानाच 141 धावांवर सर्वबाद झाला होता. अब्दुल समदनं 36 तर मिशेल मार्शनं 35 धावा केल्या.
दिल्लीच्या एनगिडी आणि नटराजन यांनी प्रत्येकी 3 तर कुलदीपनं दोन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघानं 17 ओव्हरमध्येच आव्हान पूर्ण केलं. समीर रिझवीनं नाबाद 70 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्जनं नाबाद 39 धावा केल्या.
समीर रिझवी प्लेयर ऑफ द मॅच ठरला.
सामना क्रमांक 06 - SRH vs KKR
कोलकात्याच्या इडन गार्डनच्या मैदानावर झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यात हैदराबादनं कोलकात्याला घरच्या मैदानावर धूळ चारली.
प्रथम फलंदाजी करताना हैदराबादनं त्यांची जमेची बाजू असलेल्या फलंदाजांच्या तडाखेबाज खेळींच्या जोरावर कोलकातासमोर 227 धावांचं आव्हान ठेवलं.
हेडनं 21 चेंडूत 46 तर अभिषेकनं 21 चेंडूत 48 धावा केल्या. क्लासेननं 35 चेंडूत अर्धशतकी 52 धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात कोलकाताचा संपूर्ण संघ 16 ओव्हरमध्ये 161 धावांवर बाद झाला. उनाडकटनं तीन तर इशान मलिंगा आणि रेड्डीनं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)