'1200 वर्षं अखंड ज्योत' प्रज्वलीत ठेवणारं जपानी मंदिर जळून राख झालं तेव्हा...

व्हीडिओ कॅप्शन, '1200 वर्षं अखंड ज्योत' तेवणारं जपानी मंदिर जळून राख झालं तेव्हा...
'1200 वर्षं अखंड ज्योत' प्रज्वलीत ठेवणारं जपानी मंदिर जळून राख झालं तेव्हा...
Published

1200 वर्षांपासूनची तेवती ज्योत असणारं जपानमधलं एक मंदीर आगीत भस्मसात झालंय.

एका बौद्ध भिक्खूंनी पश्चिम जपानच्या हिरोशिमा भागातल्या दायशोइन टेम्पलच्या रेकाडो हॉलमध्ये प्रज्वलित केलेली ही ज्योत इसवी सन 806 पासून अखंड सुरू असल्याचा मियाजिमा पर्यटन संघटनेचा दावा आहे.

इथल्याच अग्नीने हिरोशिमा शांतता स्मारकाची ज्योत प्रज्वलित करण्यात आली होती. हे स्मारक 1945च्या हिरोशिमा हल्ल्यातील पीडितांच्या स्मृतीत बांधण्यात आलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)