बशर अल-असद सीरिया सोडून पळाल्यानंतर त्यांच्या घरात घुसून लोकांनी काय केलं, पाहा

व्हीडिओ कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद सीरिया सोडून पळाले, मग लोकांनी राजमहालातले एसी, कपाट पळवले
बशर अल-असद सीरिया सोडून पळाल्यानंतर त्यांच्या घरात घुसून लोकांनी काय केलं, पाहा
Published

बशर अल-असद यांनी सीरिया सोडल्यानंतर राजधानी दमास्कसमधील राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानात सीरियन नागरिकांनी घुसून नासधूस केली.

या ठिकाणी बीबीसीला रिकाम्या खोल्यांमध्ये सामान आणि फर्निचर फेकलेले दिसले.

राष्ट्राध्यक्ष असद यांनी देश सोडल्याची पुष्टी रशियाने केली आहे आणि त्यांनी सरकारचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे. त्यांचा सध्याचा ठावठिकाणा माहीत नाही.