भारतात मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत झाले ‘हे’ बदल…। सोपी गोष्ट 686

व्हीडिओ कॅप्शन, भारतात मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत झाले ‘हे’ बदल…। सोपी गोष्ट 686
Published

भारतातल्या मुलं दत्तक घेण्याच्या कायद्यामध्ये अलीकडेच काही बदल करण्यात आले. त्यानुसार, दत्तक ग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्याची सुनावणी न्यायालयासमोर न होता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होईल.

न्यायालयांवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. पण, त्यामुळे दत्तक ग्रहणाची प्रक्रिया आधीपेक्षा सुटसुटीत आणि लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात या प्रक्रियेच्या अंमलबजावणीचा गोंधळ वाढलेला दिसतोय.

कायद्यातले बदल आणि त्यामुळे लोकांचा गोंधळ का उडायला, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…

लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके

संशोधन - रोहन नामजोशी

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)