मुंबई : बांद्रामधल्या आगीनंतरची भीषण दृश्यं

Published

बांद्रा रेलवेस्थानकाजवळ अतिक्रमण हटवताना लागलेल्या आगीने अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत. बीबीसी मराठी प्रतिनिधी राहुल रणसुभे यांनी टिपलेली ही क्षणचित्रे.

बांद्रा
फोटो कॅप्शन, बांद्रा रेलवेस्थानकाजवळ असलेल्या झोपडपट्टीत गुरुवारी दुपारी अतिक्रमण हटवताना भीषण आग लागली.
बांद्रा
फोटो कॅप्शन, या आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
बांद्रा
फोटो कॅप्शन, सिलिंडरच्या स्फोटांनी आगीची तीव्रता आणखी वाढली. अग्निशमन दलाच्या 16 गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली
बांद्रा
फोटो कॅप्शन, अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आगीवर नियंत्रण मिळवलं.
बांद्रा
फोटो कॅप्शन, आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण परिसर व्यापला होता.
बांद्रा
फोटो कॅप्शन, एका क्षणात होत्याचं नव्हतं झाल्यामुळे इथल्या रहिवाशांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बांद्रा
फोटो कॅप्शन, शून्यात हरवलेली नजर आणि अधांतरी भविष्य....
बांद्रा
फोटो कॅप्शन, या आगीत अनेक कुटुंबांच्या डोक्यावरचं छप्पर उडालं. त्यांच्यापुढे निवाऱ्याचा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.
बांद्रा
फोटो कॅप्शन, भिंत खचली... कलथून खांब गेला...
बांद्रा
फोटो कॅप्शन, आगीमुळे बांद्रा स्थानकाजवळील अनधिकृत झोपडपट्टयांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.