पुणे जिल्ह्यातील या भागात मुसळधार पाऊस पडतो, तरीही इथले गावकरी उन्हाळ्यात तहानलेले का?
पुणे जिल्ह्यातील या भागात मुसळधार पाऊस पडतो, तरीही इथले गावकरी उन्हाळ्यात तहानलेले का?
Published
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यात पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो. उन्हाळ्यात इथल्या गावकऱ्यांना आणि विशेषत: महिलांना दिवसभर दूरवरून पाणी आणण्यासाठी पायपीट करावी लागते.
हा परिसर डोंगराळ भागात आहे. तिथे कायमस्वरूपी जलस्रोत नाहीत. उन्हाळा आला की तात्पुरते तयार झालेले जलस्रोत कोरडे पडतात. तसंच, याठिकाणी जल जीवन मिशनचं कामही मोठ्या प्रमाणात बाकी आहे. जिथे काम पूर्ण झालं आहे, तिथेही पाण्याचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे.
अधिक जाणून घेण्यासाठी पाहा बीबीसी मराठीचा ग्राउंड रिपोर्ट.
रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ, बीबीसी मराठी प्रतिनिधी
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)






