मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाजवळच्या गावातच पाण्यासाठी 3 तासांचा जीवघेणा प्रवास - ग्राऊंड रिपोर्ट
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाजवळच्या गावातच पाण्यासाठी 3 तासांचा जीवघेणा प्रवास - ग्राऊंड रिपोर्ट
Published
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा धरणाच्या काठावरचं दापूरमाळ गाव… पण इथल्या आदिवासींना आजही पाण्यासाठी डोंगर उतरावा लागतो.
दररोज चार किलोमीटरचा उभा डोंगर उतरून महिलांना, लहान मुलांना आणि वृद्धांना पाणी आणावं लागतं. एका हंडाभर पाण्यासाठी तीन तासांची पायपीट. ना रस्ता, ना टँकर, ना पाइपलाईन.
विशेष म्हणजे, याच धरणातून मुंबईला पाणीपुरवठा होतो.
या भागात मुसळधार पाऊस पडतो, तरी उन्हाळ्यात गावं तहानलेली का राहतात?
पाणीटंचाईमुळे शिक्षण, आरोग्य आणि संपूर्ण आयुष्यावर काय परिणाम होतो?
- रिपोर्ट- दिपाली जगताप
- शूट- शाहिद शेख
- व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्युजरूमचे प्रकाशन)






