खासदार फुटीवर ठाकरेंचे शिवसैनिक काय म्हणतात?
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा पक्षफुटीचा सामना करावा लागत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची गुरुवारी (18 जून) दिल्लीत संसद भवनातील पक्ष कार्यलयात बैठक पार पडली.
सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल देसाई यांनी 17 जून रोजी व्हीप काढला होता. मात्र, प्रत्यक्षात लोकसभेतील 3 आणि राज्यसभेतील एक खासदारच उपस्थित राहिले.
उपस्थित राहिलेल्यांमध्ये संजय राऊत हे राज्यसभेतील खासदार, तर अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे लोकसभेतील खासदार होते.
उर्वरीत म्हणजे ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, नागेश आष्टीकर, संजय देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे आणि संजय (बंडू) जाधव हे लोकसभेतील खासदार उपस्थित नव्हते.
यापूर्वीच एकनाथ शिंदेंच्या बंडानं ठाकरेंकडून शिवसेनाच हिसकावली गेलीय. आता हे त्यानंतरचं पहिलं मोठं बंड असेल. यावर शिवसैनिक काय म्हणत आहेत?
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



