महाकाय रॉकेटचा जेव्हा हिंदी महासागरात स्फोट झाला, इलॉन मस्क यांच्या स्टारशिपचं काय झालं?

महाकाय रॉकेटचा जेव्हा हिंदी महासागरात स्फोट झाला, इलॉन मस्क यांच्या स्टारशिपचं काय झालं?
Published

इलॉन मस्क यांच्या स्पेस-एक्सचं स्टारशिप V3 हे महाकाय रॉकेट हिंदी महासागरात उतरल्यावर स्फोटात नष्ट झालं.

शुक्रवारी 22 मे रोजी अमेरिकेतील टेक्सासच्या किनाऱ्यावरून या यानानं यशस्वी उड्डाण केलं होतं. 124 मीटर म्हणजे 407 फूट उंचीचं हे रॉकेट आजवरच्या इतिहासातलं सर्वात मोठं रॉकेट असून नासा या यानाचा भविष्यातील चांद्र मोहिमा आणि मंगळ मोहिमांसाठी वापर करण्याच्या विचारात आहे.

त्यामुळेच या चाचणी मोहिमेवर जगभरातील लोकांचं लक्ष होतं. उड्डाणानंतर या रॉकेटनं 20 डमी सॅटेलाईट्स पृथ्वीच्या कक्षेत सोडले. त्यानंतर तासाभरानं यानानं पुन्हा वातावरणात प्रवेश केला आणि हिंदी महासागरात स्प्लॅशडाऊन केल्यावर ठरल्याप्रमाणे यानात स्फोट झाला.

या रॉकेटमध्ये दोन्ही टप्प्यांवर इंजिनात बिघाड झाला, पण स्टारशिप V3 नं या चाचणीतील बहुतांश उद्दीष्टं पूर्ण केली.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन